रायगड -महाडमधील तळई येथे दरड कोसळल्याच्या घटनेत 85 व्यक्ती अडकल्या असून त्यापैकी 23 जुलैच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 44 मृतदेह आढळले आहेत. तर अद्यापही 41 व्यक्ती बेपत्ता आहेत. रायगड जिल्हा प्रशासनामार्फत ही माहिती देण्यात आली.
तळई गावाची लोकसंख्या 241 असून त्यापैकी 109 व्यक्ती गावाबाहेर होत्या. 41 व्यक्तींची सुटका करण्यात आली. 6 व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत 13 बैल व 20 गाई अशा एकूण 33 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय आपत्ती बचाव पथक, स्थानिक बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने शोध कार्य अद्यापही सुरू आहे.
ओळख पटली -
बचाव कार्यादरम्यान आढळलेल्या 44 पैकी 33 मृतदेहांची ओळख पटली आहे.
महाडव पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन -
प्रशासनाकडून करण्यात आलेले आवाहन - मौजे केवनाळे ता. पोलादपूर येथेही अतिवृष्टीमुळे दरड कोसळून 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 6 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
- तर मौजे साखर सुतारवाडी ता. पोलादपूर येथेही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. इतर 16 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर अजूनही 1 व्यक्ती बेपत्ता आहे.
रायगडजिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल सकाळी ८ वा.
नद्यांची पाणी पातळी अहवाल