पुणे :आई या शब्दातच नात आणि त्या नात्यापलिकडील प्रेम हे आपण नेहेमी पाहत असतो, बघत असतो. आपल्या मुलासाठी एक आई काहीही करू शकते. हे आपण दरोरोजच्या आयुष्यात पाहत असतो. पण पुण्यात एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सैन्यदलातील एका जवानाबरोबर स्वत: लग्न केल्यानंतर आपल्या अल्पवयीन मुलीचेही त्याच्यासोबतच लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला ( Mother Tie Knot Minor Daughter With Army Jawan ) आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी जवानाला बेड्या ठोकल्या आणि आईविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
आईने बापाबरोबर लावले अल्पवयीन मुलीचे लग्न अल्पवयीन मुलीचेही जवानासोबत लग्न :सागर जयराम दातखिळे ( 28, रा. उस्मानाबाद ) असे या जवानाचे नाव आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा लष्करात कार्यरत आहे, तर पीडित मुलीचे वडील घर सोडून गेलेले असून, पीडिता ही आईबरोबर राहते. सध्या ती एका शाळेत शिकत असून, फिर्याद दाखल होताच तत्काळ कारवाई करीत पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंधरा वर्षीय मुलगी :याप्रकरणी फिर्यादींच्या कार्यालयात गुरुवारी एक पंधरावर्षीय मुलगी आली. तिची विचारपूस केल्यानंतर पीडितेने सांगितले की, तिच्या आईने बळजबरीने तिचे लग्न सागर नावाच्या (लष्करातील जवान) एका व्यक्तीबरोबर लावून दिले आहे. बार्शी येथे एका लग्नाला गेल्यानंतर पीडित मुलीची आणि संशयित आरोपीची ओळख झाली होती. तो पुण्यात पीडित मुलीच्या घरी वारंवार येत असे. तसेच दहा ते पंधरा दिवस तो राहत असे. सागर ऊर्फ सागरकाका आर्मीमध्ये नोकरी करीत असल्याचे तिने फिर्यादी यांना ( Mother Daughter Married With Same Army Jawan ) सांगितले. तसेच त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जात असल्याचेही तिने सांगितले.
काका हे वडिलांसारखे : सागर याचे आणि पीडित मुलीच्या आईचे अनैतिक संबंध होते. तिच्या आईने तिला सागरकाका हे तुझ्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांच्यासोबत लग्न करणार आहे, असे देखील सांगितले होते. यानंतर सागरकाकाने पीडित मुलीच्या आईला कुुंकू लावून तिला मंगळसूत्र देखील घातले होते. त्यानंतर पीडित मुलगी आईने सांगितल्यानुसार त्याला पप्पादेखील म्हणत होती.
सागर काका बरोबर लग्न : काही दिवसांनी अचानक तिच्या आईने तुला सागरबरोबर लग्न करायचे सांगितले. पीडित मुलीने लग्नाला विरोध केल्यानंतरही आईने तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तिचे लग्न सागरसोबत 6 नोव्हेंबरला अहमदनगर येथे मंदिरात लावून दिले. त्यानंतर आईने जबरदस्तीने सागरबरोबर पीडित मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या भीतीने ती शाळेत रडत असताना तिला तिच्या वर्गातील एका मित्राने विचारणा केली. तिने त्याला हकिकत सांगितली. तो तिला फिर्यादी यांच्याकडे घेऊन गेला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद ( Case Registered Against Mother Jawan Arrested ) दिली.