महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 26, 2020, 3:37 PM IST

ETV Bharat / state

बारामतीत भाजीपाला शेती व कलम तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न; 72 कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग

अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, व भाजीपाला गुणवत्ता केंद्र (इंडो-डच प्रकल्प) आणि आटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेती व भाजीपाला कलम तंत्रज्ञान' ही ऑनलाईन कार्यशाळा पार पडली.

Vegetable Agriculture Technology Workshop Pune
बारामतीत भाजीपाला शेती व कलम तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न

पुणे - अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती, व भाजीपाला गुणवत्ता केंद्र (इंडो-डच प्रकल्प) आणि आटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेती व भाजीपाला कलम तंत्रज्ञान' ही ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील ४० कृषी विज्ञान केंद्र, गुजरातमधील ३० कृषी विज्ञान केंद्र व गोवा राज्यातील २, असे ७२ कृषी विज्ञान केंद्र व त्यामधील वरिष्ठ शास्त्रज्ञ व विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) सहभागी झाले होते.

हेही वाचा -परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

प्रशिक्षणाची सुरुवात आटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग यांच्या मार्गदर्शनाने झाली. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात अशा प्रकराची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आभार मानले. सद्यपरिस्थिती बघता महाराष्ट्रामध्ये नेदरलँड तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संरक्षित शेती तंत्रज्ञान महत्वाचे आहे, असे पवार म्हणाले.

शेती अवगत करण्याचे मार्गदर्शन

प्रथम सत्रामध्ये हॉलंड डोअर नेदरलँड कंपनीचे संचालक निक बोडन यांनी नेदरलँडमधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला शेती व भारतातील शेती यामधील फरक अवगत करावयाच्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. नेदरलँडमधील ९० टक्के भाजीपाला निर्यात केला जातो. यामध्ये प्रामुख्याने ग्रीनहाऊस वातावरण नियंत्रण, स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा व पिकांच्या काढणीपश्चात व्यवस्थापनावर कसा भर दिला जातो, याविषयी त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा -भारतातील एका रत्नापैकी रघुनाथ माशेलकर एक रत्न - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details