महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 20, 2021, 7:15 PM IST

ETV Bharat / state

बारामतीत दोन गटात हाणामारी; भांडणात वकील व पत्रकाराचा समावेश

बारामती शहरातील श्रावण गल्ली येथे दोन गटात मारहाण आणि भांडण झाल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या भांडणात वकील व पत्रकाराचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन
बारामती शहर पोलीस स्टेशन

बारामती- शहरात दोन गटात झालेल्या भांडण व मारहाण प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांंवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री शहरातील श्रावण गल्ली येथे ही घटना घडली. यातील काहींना पोलिसांनी अटक केली आहे. या भांडणात वकील व पत्रकाराचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.


भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे मारहाण
सदर घटनेप्रकरणी फिर्यादी तैनुर शफीर शेख ( वय.४१वर्ष व्यवसाय-पत्रकार, रा.श्रावण गल्ली बारामती ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आम्ही मदरशाचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे त्याचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून हातात प्राणघातक हत्यार, लोखंडी तलवार,लाकडी काठ्या, घेऊन आम्हास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले. व त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये चालत घेऊन येत असताना वाद घालत हातात दगड व लाकडी काठ्या घेऊन यांना जीवे ठार मारा, यांना जिवंत सोडू नका, त्यांचे तुकडे करा, अशी धमकी व शिवीगाळ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा-बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी

क्रिकेट खेळण्यावरून वाद
तसेच दुसऱ्या गटातील साहील निसार बागवान (वय २२, वर्षे धंदा-फळे विक्री, रा बारामती ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सैफ कैश शेख व मुस्किन मन्सूर बागवान या दोघांच्यात क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कैश शेख यांनी कोयता मारला असता अडवताना डाव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोट तुटून चमडीला लटकत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून कैश शेख ,तैनुर शेख,शाहनुर शेख, कैश शेख यांची पत्नी नाव माहीत नाही, सैफ शेख व अनोळखी १० ते १२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल
तैनुर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी २६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अल्ताफ बागवान, अरबाज अल्ताफ बागवान, सोहेय अल्ताफ बागवान, सलमान अल्ताफ बागवान,वाहीद अल्ताफ बागवान, मुस्तकीन मन्सुर बागवान, निहाल मन्सुर बागवान, पाय निसार बागवान, तन्वीर बागवान, वसीम रफीक बागवान उर्फ घोडा, मुक्तार बागवान,अबरार असिफ खान, सलीम पीर मोहमद बागवान, अमजद अजिज बागवान, फिरोज जिज बागवान, असिफ जाफर बागवान, फईम उर्फ सलमान फकीर बागवान, तौफिक बेबई बागवान, असिफ अब्दुल्ला खान, पाबाज असिफ खान, मुक्तार अखलास बागवान, अबार उर्फ जोन आखलाख बागवान, सादीक उस्मान दलाल बागवान, निस्सार बागवान, फरहाण आयुब बागवान, असिफ रज्जाक बागवान (सर्व.रा. बागवान गल्ली ,बारामती जि.पुणे )

हेही वाचा-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details