महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून साडेसात लाखांची चोरी; दोघांना अटक

By

Published : Jul 28, 2020, 5:33 PM IST

दोन दिवसांपूर्वी भोसरीमधील मुलाणी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची खिडकी फोडून तेथील साडेसात लाख रुपये चोरी झाले होते. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Criminals
आरोपी

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये मुलाणी पेट्रोल पंपाच्या कार्यालयामधील साडेसात लाख रुपये चोरी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहेत.

पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली

नारायण आप्पा पवार (रा. दिघी) आणि रमेश प्रभू पवार, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी नारायण याला मेहुण्याकडून घेतलेले 80 हजार परत करायचे होते, म्हणून त्याने चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी केलेली रक्कम चोरट्यांनी ओढ्यातील एका झाड्याच्या बुंध्यात लपवून ठेवली होती.

दोन दिवसांपूर्वी भोसरीमधील मुलाणी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची खिडकी फोडून तेथील साडेसात लाख रुपये चोरी झाले होते. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी नारायण हा त्याच पेट्रोल पंपावर काही महिन्यांपासून काम करत होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने साथीदार रमेशच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी नारायण आणि रमेश दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलास, गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, संतोष महाडिक, समीर रासकर, सुमित देवकर, अजय डगळे, सागर भोसले, सागर जाधव, बाळासाहेब विधाते यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details