महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

‘वारी लालपरीची' फिरत्या चित्रप्रदर्शनातून उलगडला एसटीचा प्रवास

'वारी लालपरीची' या फिरत्या चित्रप्रदर्शनातून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटीचा) गेल्या पाच वर्षांतील प्रवास नागरिकांसमोर आला आहे.

By

Published : Jul 3, 2019, 6:38 PM IST

‘वारी लालपरीची' फिरत्या चित्रप्रदर्शनातून उलगडला एसटीचा प्रवास

पुणे- 'वारी लालपरीची' या फिरत्या चित्रप्रदर्शनातून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटीचा) गेल्या पाच वर्षांतील प्रवास नागरिकांसमोर आला आहे. हे फिरते चित्रप्रदर्शन एसटी महामंडळाच्या एका बसमध्येच भरविण्यात आले आहे. पाच वर्षात एसटीत झालेले बदल आणि विकासाचा प्रवास चित्ररुपात घेऊन ही ‘वारी लालपरीची' एसटी राज्यातील निवडक बस स्थानकांवर फिरणार आहे.

‘वारी लालपरीची' फिरत्या चित्रप्रदर्शनातून उलगडला एसटीचा प्रवास

आजपासून 2 दिवस या फिरत्या चित्रप्रदर्शनाचा मुक्काम सलग 2 दिवस पुण्यात असणार आहे. सध्या ही लालपरीची वारी एसटी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात दाखल झाली आहे. 'वारी लालपरीची' या निमित्ताने एसटीच्या मागील 5 वर्षांचा प्रवास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.

पाच वर्षांतील एसटीचा प्रवास प्रत्येक प्रवाशाला, नागरिकांना कळावा, या उद्देशाने हे प्रदर्शन भरिवण्यात आले आहे. 5 वर्षांपूर्वीची एसटी, त्यात झालेले बदल, एसटीने सुरू केलेल नवीन उपक्रम, नवीन गाड्या, नवा गणवेश, वारी, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांची पेललेली आव्हाणे, हा सर्व प्रवास यानिमित्ताने चित्ररुपामध्ये मांडण्यात आला आहे.

'वारी लालपरीची’ हे फिरते चित्रप्रदर्शन बुधवारी 3 जुलैला स्वारगेट बसस्थानक तर गुरुवारी 4 जुलैला शिवाजीनगर बसस्थानकात हे फिरते चित्रप्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी 10 ते सांयंकाळी 6 या वेळेत मोफत खुले राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी 5 जुलैला बारामती तर, शनिवारी 6 जुलैला इंदापूर बसस्थानकावर हे चित्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details