महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छता गृहाचा स्लॅब कोसळला; वृद्ध महिला जखमी

पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोड येथे सार्वजनिक महिला स्वच्छता गृहाचा स्लॅब कोसळून वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कृष्णाबाई कागडा(वयल ६५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

By

Published : Aug 8, 2019, 6:08 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्ध महिलेच्या अंगावर पडला सार्वजनिक स्वच्छता गृहाचा स्लॅब

पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरातील देहूरोड येथे सार्वजनिक महिला स्वच्छता गृहाचा स्लॅब कोसळून एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कृष्णाबाई कागडा(वयल ६५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे स्वछता गृह मोडकळीस आलेले आहे. मात्र, याकडे संबंधित देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्ध महिलेच्या अंगावर पडला सार्वजनिक स्वच्छता गृहाचा स्लॅब

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या पारशी चाळीतील सार्वजनिक स्वच्छता गृहात शौचास बसल्या असताना भला मोठा स्लॅबचा तुकडा महिलेच्या डोक्यावर पडला. यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. २०१८ सालीच महिलांनी या शौचालयाची डागडुजी करण्याची मागणी केली होती. मात्र, बोर्डाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची घटना घडली, असा आरोप स्थानिक महिला करत आहेत. घटनेनंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन या ठिकाणी फिरकले देखील नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी थेट डब्बा आंदोलन करत कॅन्टोमेंट बोर्ड गाठून प्रशासनाला धारेवर धरले.

ABOUT THE AUTHOR

...view details