महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2020, 8:52 PM IST

ETV Bharat / state

पुरंदर विमानतळाबाबत शरद पवार आणि संरक्षण मंत्र्यात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट घेतली. पुण्यातील प्रस्तावित पुरंदर विमानतळावर दोघांनी चर्चा केली.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट घेतली. पुण्यातील प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या कामाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. विमानतळाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी शरद पवारांनी केली. पुणे विमानतळावरील भार कमी करण्यासाठी पुण्यापासून जवळच पुरंदर येथे विमानतळ बांधण्यात उभारण्यात येणार आहे.

ट्विट

ट्विटरवरून पवारांनी दिली माहिती -

'संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सचिव आणि नागरी उड्डाण विभागाच्या सचिवांची दिल्लीत भेट घेतली. प्रस्तावित पुरंदर विमानतळाबाबत चर्चा केली. पुणे विमानतळवरील भार कमी करण्यासाठी दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केले आहे. विमानतळाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे, अशी मागणी केली, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details