महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे

भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. या दुचाकीच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे

By

Published : Oct 19, 2019, 6:17 PM IST

पुणे - शरद पवारांची भर पावसात सातारा येथे झालेली सभा ही राजकारणात प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी सभा होती. निसर्गाला देखील त्यांनी आव्हान दिल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

साताऱ्यातील शरद पवारांची सभा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी - अमोल कोल्हे

भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची रॅली आयोजित करण्यात आली होती. या दुचाकीच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज (१९ ऑक्टोबर) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळ पासूनच प्रचाराला लागले होते. भोसरी मतदारसंघात गुरु विरूद्ध चेला अशी रंगत बघायल मिळत आहे. त्यातच कोल्हे यांच्या रॅली मुळे निवडणुकीचे वातावरण फिरल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हे म्हणाले, की आज ७९ वर्षाचे तरुण शरद पवार हे निसर्गाला ही आव्हान देत सभा घेत आहेत. त्यांना निसर्ग मनाचा मुजरा करतोय. शरद पवार यांची लाट होती ती आता कृतज्ञतेची लाट तयार झाली आहे. ५५ वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिल्यानंतर आज महाराष्ट्र पुन्हा चुकीच्या हातात जाऊ नये, भारतीय जनता पक्षाच्या हातात जाऊ नये, म्हणून शरद पवार हे लढवय्या प्रमाणे लढत आहेत. हा महाराष्ट्र पवारांना साथ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -'भाजप-सेनेचं दिवाळं काढल्याशिवाय दिवाळी साजरी करायची नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details