महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्याच पावसाने पुणे तुंबले; महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल

पुण्यात नालेसफाईसाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, यंदा हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे.

By

Published : Jun 25, 2019, 12:17 PM IST

लष्कर पोलीस ठाण्याला आलेले तलावाचे स्वरुप

पुणे - पावसाळ्यापूर्वी पुणे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, सोमवारच्या पावसाने शहरातील अनेक नाले, गटारी मोठ्या प्रमाणात तुंबले होते. त्यामुळे त्यांचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे.

लष्कर पोलीस ठाण्याला आलेले तलावाचे स्वरुप

सोमवारी पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे पोलीस ठाण्याला तलावाचे स्वरुप आले होते. या पाण्यात नागरिकांच्या दुचाकी तसेच चारचाकी तरंगत असलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच सिंहगड रोड, पर्वती, कोथरूड, धायरी, धानोरी आणि हडपसर परिसरात पाणी साचले होते.

पुण्यात नालेसफाईसाठी दरवर्षी ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, यंदा हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. पुन्हा शहरात पाणी तुंबू नये यासाठी महापालिका काय उपाययोजना करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details