महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 6, 2020, 1:52 PM IST

ETV Bharat / state

पुण्यातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर बंद

पुणे शहरातील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

कोविड केअर सेंटर
कोविड केअर सेंटर

पुणे - मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विमान नगर परिसरात उभारलेले साडेतीन हजार क्षमतेचे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (शुक्रवार) हे कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार आहे.

शहरातील सर्वात मोठे सेंटर बंद

महापालिका आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने हे सेंटर उभारण्यात आले होते. तब्बल साडेतीन हजार रुग्ण क्षमतेचे केअर सेंटर होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे.

मनुष्यबळ आणि वाढता खर्च

मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमधील काही बेड रिकामे पडून आहेत. त्यामुळे मनुष्यबळ व्ववस्थापनाने कोविड केअर सेंटर चालविण्याचा खर्च वाचवण्यासाठी सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या 5 हजार 497 सक्रीय रुग्ण

पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाबधितांची रुग्ण संख्या 1 लाख 62 हजार 647 वर पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 52 हजार 841 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत शहरात 5 हजार 497 रूग्णांव उपचार सुरू आहे. यातील 481 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. तर 275 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details