महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमधून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त; चार जणांना अटक

By

Published : Nov 30, 2020, 6:57 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड आणि सांगवी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईतून पिस्तूल बाळगणाऱ्या चौघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली.

पुणे
पुणे

पुणे -पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड आणि सांगवी पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईतून पिस्तूल बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कामगिरी देहूरोड आणि सांगवी पोलिसांनी केली आहे. अमोल अशोक कालेकर (वय 25), अमोल ज्ञानेश्वर दळवी, अभिषेक विष्णू कदम (वय 21) आणि लक्ष्मण गणेश शेळके (वय 22), अशी आरोपींची नावे आहेत.

देहूरोड आणि सांगवी पोलिसांनी जप्त केले तीन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना माहिती मिळाली होती की, एक इसम गावठी पिस्तूल घेऊन देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत आहे. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद गज्जेवार यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि आरोपी अमोल अशोक कालेकर याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतुस मिळाले. कसून चौकशी केली असता त्याने अमोल ज्ञानेश्वर दळवी याच्याकडून पिस्तूल घेतल्याचे समोर आले.

अमोल ज्ञानेश्वर दळवीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून एक देशी बनवटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. देहूरोड पोलिसांनी एकूण दोन गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

सांगवी पोलिसांकडून एक पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त -

सांगवी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी अभिषक कदम आणि लक्ष्मण शेळके यांना अटक करण्यात आली आहे. ते वाहनचालक आणि डिलिव्हरी बॉय असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details