महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला आग

ब्रेकडाऊन झाल्यामुळे पीएमपीचे कर्मचारी, ही बस आगारात घेऊन जात होते. त्याच वेळी बसला आग लागली. या आगीत बसचा अर्धा भाग पूर्णपणे जळून खाक झाला,  अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

By

Published : Feb 28, 2019, 10:54 AM IST

जळालेली बस

पुणे- कोथरूड येथील भेलके नगर परिसरात पीएमपीएमएल बसला बुधवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

ब्रेकडाऊन झाल्यामुळे पीएमपीचे कर्मचारी, ही बस आगारात घेऊन जात होते. त्याच वेळी बसला आग लागली. या आगीत बसचा अर्धा भाग पूर्णपणे जळून खाक झाला, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भेलके नगर भागात ही बस बंद पडली होती. यानंतर पीएमपीएमएलचे कर्मचारी ही बस घेऊन डेपोत चालले होते. अचानक या बसच्या समोरील भागातून धूर निघण्यास सुरुवात झाली. समोरून जाणाऱ्या एका नागरिकाने हे ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर ड्रायव्हरने बस थांबवून अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसचा अर्धा भाग जळाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details