पुणे -मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर असलेल्या ओझर्डे गावाच्या लगतच एक सुंदर धबधबधबा असून तो सर्वांना आकर्षित करत आहे. लोणावळा, खंडाळा येथे पर्यटकांची पावसाळ्यात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला धबधब्या खाली थांबून कुटुंबासह मनसोक्त आनंद लुटता येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. भुशी धरण परिसरात टवाळी करणारेच लोक जास्त दिसत असल्याने सहकुटुंब येणारे पर्यटक या ठिकाणाकडे पाठ फिरवत आहेत. अशा पर्यटकांसाठी ओझर्डे गावचा धबधबा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
निरव शांतता असलेला ओझर्डे गावचा धबधबा पाहिलात का? - आकर्षित
लोणावळा, खंडाळा येथे पर्यटकांची पावसाळ्यात नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला धबधब्या खाली थांबून कुटुंबासह मनसोक्त आनंद लुटता येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. अश्यात ओझर्डे गावचा धबधबा हा पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
द्रुतगती महामार्गालगत डोंगर कुशीत ओझर्डे गाव आहे. पावसाळ्यात ओझर्डे गावचे सौंदर्य आणखी खुलून दिसते, भात शेती, हिरवा शालू परिधान केलेले डोंगर, उंच दऱ्या खोऱ्यातून कोसळणारे धबधबे, गावात असलेली कौलारू घरे हे गावच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडतात. दरम्यान, गावालगत धबधबा असला तरी या ठिकाणी गावकऱ्यांची वरदळ नाही. जाईबाई मंदिराच्या समोर आहे असा धबधबा कुठेही पाहायला मिळणार नाही.
उंचावरून पडणारे पाणी, त्याचा मंजुळ आवाज आणि निरव शांतता हे या धबधब्याचे वैशिष्ट्य आहे. अनेक पर्यटक या धबधब्याकडे आकर्षित होत आहेत. सध्या पर्यटक लोणावळा, मळवली, खांडी, भूशी, पवना आदी धरणे बघण्याकरीता मोठ्या वाहतूक कोंडीतून प्रवास करून या ठिकाणी जातात. पण याच आढे ओझर्डे, ऊर्से डोंगरावर अनेक छोटे मोठे धबधबे आहेत. मात्र, बऱ्यापैकी वाहने डोंगरापर्यंत पोहोचत नाहीत. तर सोमाटणे येथून हा धबधबा आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पर्यटक प्रेमींना अगदी जवळ असलेल्या या धबधब्याचा आनंद कुठलाही वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास न होता घेता येईल हे नक्की.