महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2022, 10:52 PM IST

ETV Bharat / state

Chandrakant Patil : 26 /11 हल्ल्याच्या घटनेचा अभ्यासक्रमात सहभाग करणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मी मुख्यमंत्री, उपमुख्मंत्रीयांच्या निदर्शनास आणून आणि शालेय शिक्षण मंत्री केसरकर ( School Education Minister Kesarkar ) यांच्या समवेत आम्ही लवकरच 26 / 11 च्या हल्ल्याच्या घटनेचा धडा शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात आणू, असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Minister Chandrakant Patil ) यांनी दिले आहे. २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुष्पचक्र व मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे : देशाला स्वतंत्र मिळालेले असेल, विविध युद्ध असेल, 26 / 11 चा हल्ला असेल किंवा जर्मन बेकरीचा ब्लास्ट असेल हे सर्व गोष्टी नीट तरुणांच्या समोर यायला हवं.अन्यथा अस वाटेल की हे जे स्वतंत्र आहे ते सहजा सहजी मिळालेलं आहे.26 / 11 चा हल्ला त्यात जे जवानांनी केलेलं संघर्ष तसेच त्यांचं बलिदान हे सर्वांसमोर येण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात यावर धडा यावा, अशी मागणी समोर आली आहे.

26/11 च्या घटनेचा अभ्यासक्रमात आणणार - 2014 ते 19 जेव्हा भाजप - सेना युतीचे सरकार होते तेव्हा शालेय शिक्षण मंत्री हे शालेय आणि महाविदयालयीन दोघांचेही एकत्र होते. त्यांनी यावर थेट काम करायला सुरूवात केली. पण मध्येच सरकार बदलले आत्ता भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे परत आले आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्मंत्रीयांच्या निदर्शनास आणून आणि शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या समवेत आम्ही लवकरच 26 / 11 च्या हल्ल्याच्या घटनेचा धडा शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात आणू ( 26 11 will be included in the curriculum ), असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher and Technical Education Minister Chandrakant Patil ) यांनी दिले आहे.

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुष्पचक्र व मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

26/11 च्या पूर्वसंध्येला शहिदांना श्रद्धांजली - आज सायंकाळी ७ वाजता 26 / 11 हल्लीच्या पूर्वसंध्येला पोलीस मित्र संघटनातर्फे बालगंधर्व चौक झाँशीची राणी पुतळ्याजवळ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अतिरेकी कसाबच्या हल्ल्यातील जखमी झालेले पोलीस अधिकारी अरुण जाधव यांचा हस्ते २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुष्पचक्र व मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील वीर पुरुषांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला

पोलिस मित्र संघटनेतर्फे आयोजन -मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील वीर पुरुषांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी या घटनेचा धडा आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात यावा त्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, हीच राज्य सरकारकडे मागणी आहे. तीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे यावेळी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details