पुणे Kesarkar On ShivSena BJP Alliance :महाविकास आघाडीचं (Uddhav Thackeray and Modi meet) सरकार असताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीला गेले होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युतीबाबत बोलणं झालं होतं आणि ही गोष्ट संजय राऊत यांनीच शरद पवार तसंच अजित पवार यांना जाऊन सांगितली. मग खलनायक कोण होतं तुम्हीच शोधा असं यावेळी केसरकर म्हणाले. ते आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सर्किट हाऊस येथे विविध विषयांवर भाष्य केलं आहे. (ShivSena BJP alliance)
मविआच्या काळात भाजपा-सेना युतीविषयी चर्चा :यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची दिल्लीत युती बाबत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात जाऊन युती करतो असं ठरवून आले तेव्हा संजय राऊत यांनीच अजित पवार आणि शरद पवार यांना ही बातमी कळवली. हे शंभर टक्के खरं आहे; कारण मी यांच्यात मध्यस्थी केली होती. महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा-सेना युतीबाबत चर्चा झाली होती आणि 15 दिवसांच्या आत युती पुनर्स्थापित होणार होती. पण कोण खलनायक आहे हे आम्हाला कळलं नाही. आता तटकरे बोलले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यामुळे युती झाली नसेल तर यात त्यांचा खूप मोठा रोल आहे, असं यावेळी केसरकर म्हणाले.
शाळांचं खासगीकरण होणार नाही :शाळा खासगीकरणाबाबत केसरकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, शाळांचं खासगीकरण होणार नाही. शिक्षक लाखोनं पगार घेत आहेत. शाळांची स्थिती बिकट आहे. त्या दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं. ते पैसे एनजीओकडे जातात. एनजीओ मुलांसाठी एवढं काही काम करतात असं नाही. शिक्षक संघटनांची मिटिंग घेऊन त्यांना शिकवायचं आहे, हे मी सांगणार आहे. शिक्षणबाबत आरोप करणारे नेते आणि संघटना यांचं मेतकूट असल्याचं यावेळी केसरकर म्हणाले.