महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे दुर्घटना : कोंढवा दुर्घटनेतील चौकशी समितीकडून विविध ठिकाणांची पाहणी; बुधवारी विशेष बैठकीचे आयोजन

पुणे शहर आणि परिसरात अशा दुर्घटना होऊ नये, यासाठी उद्या ३ जुलैला सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

By

Published : Jul 2, 2019, 6:13 PM IST

कोंढवा दुर्घटनेची पाहणी करता चौकशी समिती


पुणे - कोंढवा येथील भिंत दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीने पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी केली आहे. त्याप्रमाणेच पुणे शहर आणि परिसरात अशा दुर्घटना होऊ नये, यासाठी उद्या ३ जुलैला सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

काय होती नेमकी कोंढवा भिंत दुर्घटना? वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

जिल्हाधिकारी कार्यालयात नवल किशोर राम, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी आणि पुण्याचे पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोंढवा तसेच आंबेगाव बुद्रुक येथील घटनेचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, विठ्ठल बनोटे, आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details