पुणे- साईबाबा जन्मस्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादावर चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, कोणीही कोणाच्या भावना दुखावणार नाही. याची काळजी घ्यावी. कारण एखाद्या विषयातून नवीन समस्या पुढे येतात. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांततेच आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलेली आहे. जन्म स्थळाच्या वादासंदर्भात एकत्र बैठक सर्वांनी या चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अजित पवारांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन शुभारंभ झाला. यावेळी देशात पोलिओ निर्मूलन झालेले आहे. मात्र, पोलिओचे समूळ उच्चाटन होण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. निरोगी देशासाठी ही मोहीम गरजेची असून पुढील चार दिवस ही मोहीम सुरू राहील. जिल्ह्यात 6368 पोलिओ बूथ व्यवस्था असून पाच हजार पेक्षा जास्त ग्रुप काम करणार असल्याचे मत अजित पवारांनी व्यक्त केले. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपलं मत मांडले. त्यावेळी शिर्डी आणि पाथरीच्या वादावरही स्पष्टीकरण दिले.
दारू बंदी संदर्भात बोलताना पवार म्हणाले, अभय बंग यांच्याशी दारू बंदी संदर्भात चर्चा झाली आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वेगवेगळ्या विभागाची नक्की काय परिस्थिती आहे. रिसोर्सेस वाढवण्यासाठी काय काय करता येतील त्यांच्या सूचना घेऊन आढावा घेतला जाईल. सर्वांच्या माहितीनुसार निर्णय घेऊ. डॉ. बंग यांना वस्तुस्थिती संगितली असून त्यांनी गैरसमज झाला असल्याचे सांगितले असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा या शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज असल्याचे मतही पवारांनी व्यक्त केले. पुरंदर विमानतळासंदर्भात नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात राहिलेल्या बैठका येत्या काळात घेणार असल्याचं म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी वाडिया रुग्णालया संदर्भात केलेल्या वक्त्व्यावर बोलताना पवार म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांनी सद्सद्विवेक बुद्धीने ही भूमिका मांडली आहे. मात्र राज्य सरकार 24 कोटी आणि महानगरपालिका 22 कोटी असे एकूण 46 कोटी वाडिया रुग्णालयास दिलेत. पुढचा मार्ग सर्वांना एकत्र घेऊन चर्चेतून काढू. तातडीची गरज म्हणून 46 कोटी दिलाच अजित पवारांनी स्पष्ट केले.
तर चंद्रकांत पाटील यांच्या मेगा भरतीवर बोलताना पवार यांनी पाटील आदल्या दिवशी एक बोलतात मात्र दुसऱ्या दिवशी म्हणतात मी तसं बोललो नाही, असा टोला लगावला आहे.