महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2019, 5:00 PM IST

Updated : Nov 19, 2019, 5:44 PM IST

ETV Bharat / state

भावाला मारल्याचा जाब विचारला म्हणून चिंचवडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

अहमद सुलतान शेख (वय-२४ रा.चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुभम बनसोडे, पवन लष्करे, अक्षय पासलकर, या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड क्राईम न्यूज

पुणे- भावाला शिवीगाळ करणाऱयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण करत कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुर्गानगर चिंचवड येथे घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भावाला मारल्याचा जाब विचारला म्हणून चिंचवडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

हेही वाचा -दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

अहमद सुलतान शेख (वय-२४ रा.चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुभम बनसोडे, पवन लष्करे, अक्षय पासलकर, या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम, पवन आणि अक्षय या तिघांनी अहमद यांचा भाऊ सद्दाम याला विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी अहमद गेले. आरोपींनी त्यांना दुर्गानगर येथील सीएनजी पंपाच्या मागच्या बाजूला बोलवले. अहमद तिथे गेल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि लोखंडी कोयत्याने वार केले आहेत. पाठीवर, हातावर, पायावर वार करण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.

Last Updated : Nov 19, 2019, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details