महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 26, 2021, 7:34 AM IST

ETV Bharat / state

जुन्नर तालुक्यात बर्ड फ्लूची एन्ट्री? 200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू

येडगाव येथील परिसरात देशी कुकूटपालन फार्ममधील 200 कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्याची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गाची पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येडगाव शिवारातील दहा किलोमीटरपर्यंत परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

200 hens died in junnar pune
जुन्नर तालुक्यात बर्ड फ्लूची एन्ट्री? 200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू

जुन्नर (पुणे) -तालुक्यातील येडगाव येथील परिसरात देशी कुकूटपालन फार्ममधील 200 कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्याची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गाची पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येडगाव शिवारातील दहा किलोमीटरपर्यंत परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिनव देशमुख यांनी काढला असल्याची माहिती तहसीलदार हनुमंत केळकर यांनी दिली.

मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले
जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील गणेशनगर येथे 2000 देशी कुकूटपालनाचा पोल्ट्री फार्म आहे. याच पोल्ट्री फार्ममध्ये दोनशे कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्या आहेत. सध्या राज्यात बर्ड फ्लूचा संसर्गची स्थिती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. एस. शेजाळ यांनी दिली आहे.

जुन्नर तालुक्यात 200 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू
कोंबड्यांच्या मृत्यूचे निदान होईपर्यत सतर्कतेचा इशारा
सध्या राज्यात बर्ड फ्लूचा संसर्गची स्थिती गंभीर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने तपासनीनंतर कोंबड्यांच्या मृत्यूचे निदान होणार आहे. तोपर्यत या परिसरात सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details