महाराष्ट्र

maharashtra

दिलासादायक.. पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जण कोरोनामुक्त; तर, ५ नवे रुग्ण

By

Published : May 9, 2020, 8:22 AM IST

Updated : May 9, 2020, 12:39 PM IST

पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत १५५ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहराबाहेरील चौघांचा समावेश आहे. आत्तापर्यंत ७६ जणांना बरे करून घरी पाठविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जण कोरोनामुक्त; तर, ५ नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जण कोरोनामुक्त; तर, ५ नवे रुग्ण


पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत ७६ जणांना कोविड-१९ मधून बरे करून घरी पाठविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर, ५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, डिस्चार्ज देण्यात आलेले १५ कोरोनामुक्त हे मोशी आणि रुपीनगर या परिसरातील आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील १५ जण कोरोनामुक्त; तर, ५ नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत १५५ कोरोना बाधित आढळले आहेत. आजही ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनामुक्त व्यक्तींचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. ही शहरातील नागरिकांसाठी आणि डॉक्टरांसाठी दिलासादायक बाब आहे. आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहराबाहेरील चार कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
Last Updated : May 9, 2020, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details