महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहा हजाराची लाच मागणाऱ्या भूमापकावर गुन्हा दाखल; गंगाखेड येथील घटना

एका खासगी कंपनीच्या माणसाला दोन ठिकाणची जमीन मोजून देण्यासाठी गंगाखेडच्या भूमापकाने प्रत्येकी १० आणि १५ हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी १० हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

By

Published : Mar 16, 2019, 5:31 AM IST

परभणी5

परभणी- एका खासगी कंपनीच्या माणसाला दोन ठिकाणची जमीन मोजून देण्यासाठी गंगाखेडच्या भूमापकाने प्रत्येकी १० आणि १५ हजाराची लाच मागितली होती. त्यापैकी १० हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राजेश फाले असे या भूमापकाचे नाव आहे.

या प्रकरणी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. गंगाखेडच्या उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक राजेश फाले याला धनगर मोहा आणि डोंगरगाव येथील जमीन मोजनीचा अर्ज केला होता. मात्र, या जमिनी मोजून देण्यासाठी फाले याने अनुक्रमे १५ आणि १० हजाराची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.मात्र, त्यावेळी संशय आल्याने फाले याने लाच स्वीकारली नाही. परंतु, चौकशीत फाले याने १० हजाराची लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर गंगाखेडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय लाटकर, नूर महंमद शेख, उपअधीक्षक गजानन विखे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, हनुमंते, लक्ष्मण मुरकुटे, जहागीरदार, अनिल कटारे, अविनाश पवार आदींसह कर्मचाऱ्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details