महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 12, 2020, 8:52 AM IST

ETV Bharat / state

ग्रामीण भागात निर्मित ई-बाईक देशभर पोहचवणार; मानवतच्या तीन तरुण उद्योजकांचे स्वप्न

परभणी जिल्ह्याच्या ग्रामीन भागातील उद्योजकांनी सौरऊर्जेवर आणि विजेवर चारणारी ई बाईक तयार केली आहे. ही ई बाईक परभणीच्या कृषी संजीवनी महोत्सवातील प्रदर्शनात ही बाईक ठेवण्यात आली होती.

e-bike-was-created-by-entrepreneurs-in-rural-areas
ग्रामीण भागात निर्मित ई-बाईक देशभर पोहचवणार; मानवतच्या तीन तरुण उद्योजकांचे स्वप्न

परभणी - जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या सावरगाव येथे इलेक्ट्रिक साहित्य आणि एलईडी बनवणाऱ्या तीन तरुण उद्योजकांनी सौरऊर्जेवर आणि विजेवर चालणाऱ्या ई-बाईकची निर्मिती केली आहे. ही बाईक मोठ्या प्रमाणात तयार करून ती देशभर पोहोचविण्याचे स्वप्न या तरुणांनी बघितले आहे.

ग्रामीण भागात निर्मित ई-बाईक देशभर पोहचवणार; मानवतच्या तीन तरुण उद्योजकांचे स्वप्न

परभणीच्या कृषी संजीवनी महोत्सवातील प्रदर्शनात ही बाईक ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे ही बाईक चालवण्याचा मोह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील झाला होता. श्रीराम सावरगावकर, प्रसाद सळापुरीकर, कृष्णा घाटूळ असे या तरुण उद्योजकांचे नावे आहेत. अवघ्या काही वर्षांपूर्वी एलईडी लाइट्स बनविण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला होता. सुरुवातीला 30 ते 35 लाख रुपयांची उलाढाल होती. आता त्यांची उलाढाल जवळपास तीन ते साडेतीन कोटींवर जाऊन पोहोचली आहे. याच उद्योजक तरुणांनी आपल्या कल्पक बुद्धीतून ई-बाइक साकारली आहे. विशेष म्हणजे या बाईक वर ते सौर ऊर्जेचे पॅनल बसविणार असून, त्यामाध्यमातून ही बाईक चार्ज होणार आहे. सहा तास चार्ज झाल्यानंतर ती जवळपास 50 ते 60 किलोमीटर चालू शकेल. दोन क्विंटलपर्यंत वजन वाहून नेण्याची या बाईक ची क्षमता असून, वर्षभरात प्रत्यक्ष बाजारात आणण्याचा संकल्प त्यांचा आहे. विशेष म्हणजे मानवत सारख्या ग्रामीण भागात हा उद्योग उभा राहिला आहे. तो नावारूपास आल्यास वैशिष्ट्यपूर्ण ठरणार, यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details