महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2019, 5:38 PM IST

ETV Bharat / state

वसईमधील महालक्ष्मीची मूर्ती चक्क तांदळाच्या पिठाची

अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा तयार करण्याची परंपरा आहे. साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते. खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात येते.

वसईमधील महालक्ष्मीची मुर्ती चक्क तांदळाच्या पिठाची

पालघर - शारदीय नवरात्रोत्सवात विरार आगाशी येथील विष्णूमंदिरात गेली एक्कावन्न वर्षे अष्टमीला तांदळाच्या पिठापासून महालक्ष्मी देवीची मूर्ती साकारण्यात येते. पंचक्रोशीतील महिला मध्यरात्रीपर्यंत या देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.

विजयादाशमी उत्सव

हेही वाचा - 'आरे'मधील झाडे रात्री तोडली, 'मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

आगाशी येथील सव्वाशे वर्षे जून्या विष्णू मंदिरात अष्टमीला संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून मूर्तीचा मुखवठा साकारण्याची परंपरा आहे. साडी-चोळी नेसवून देवीची विधीवत पूजा केली जाते. खणा-नारळाची ओटी भरल्यानंतर देवीचे दर्शन भाविकांना देण्यास सुरुवात करण्यात येते. रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

महालक्ष्मी देवीचा जागर मध्यरात्री उशीरापर्यंत सुरू असतो. झिम्मा-फुगडी व देवीची गाणी गात तसेच घागर फुंकून महिला वर्ग रात्रीपर्यंत जागरण करतात. त्यानंतर उत्तररात्री दोन वाजताच्या पुढे देवीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात येते.

हेही वाचा - आरे प्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून खोटा प्रचार -मुंबई मेट्रो प्रमुख अश्विनी भिडे


बाईक 1 : प्रभावती कुलकर्णी, महिला मंडळ अध्यक्ष आगाशी

बाईट 2 : डाॅ.सुषमा जोगळेकर,माजी महिला अध्यक्षा आगाशी

ABOUT THE AUTHOR

...view details