महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2020, 6:46 PM IST

Updated : Nov 25, 2020, 7:15 PM IST

ETV Bharat / state

पालघर: अवैध दारू वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; १२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत अवैध ११७ बॉक्स विदेशी बनावटीच्या बाटल्या व पिकअप टेम्पो असा एकूण १२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांनी सांगितले.

जप्त केलेली दारू
जप्त केलेली दारू

पालघर- दादरा नगर हवेली येथून विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघर भरारी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत ११७ बॉक्स दारुच्या बाटल्या व पिकअप टेम्पो असा एकूण १२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. समीर चिंतामण पाटील व अमोल कळाकर पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कासा- उधवा मार्गावर दादरा नगर हवेली येथील विदेशी बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर भरारी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने आज पहाटे सापळा रचून (एम.एच ४८ बी.एम १६६६) या पिकअप टेम्पोची झडती घेतली. या टेम्पोत पोलिसांना दादरा नगर हवेली येथील विदेशी बनावटीचे मद्य आढळून आले.

अवैध दारू वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई

हेही वाचा-अवैद्य दारू विक्री करणारी टोळी तडीपार; बारामती पोलिसांची कारवाई



१२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीची मुद्देमाल जप्त-
पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत अवैध ११७ बॉक्स विदेशी बनावटीच्या बाटल्या व पिकअप टेम्पो असा एकूण १२ लाख ७७ हजार ३८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही.व्ही. वैद्य यांनी सांगितले.

हेही वाचा-बारामतीतील व्यापारी प्रितम शाह आत्महत्या प्रकरणातील आरोपींची येरवड्यात रवानगी


अवैध दारू वाहतुकीप्रकरणात दोघांना अटक-
पिकअप टेम्पोमधून अवैद्य मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. अटक आरोपी म्हसरोली व विक्रमगड येथील रहिवासी आहेत. समीर चिंतामण पाटील व अमोल कळाकर पाटील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक विजय भुकन, उपअधीक्षक एम. एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. वैद्य, दुकान निरीक्षक के. बी. धिंदळे, सोनावणे, मोहिते तसेच जवान बी. बी. कराड, आर. एम. राठोड, एस. एस. पवार, चौधरी व पाडवी यांनी सहभाग घेतला.

Last Updated : Nov 25, 2020, 7:15 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details