महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या विरोधात वाटली पत्रके

उस्मानाबाद येथे होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पत्रके वाटण्यात आली.

Leaflets distributed against President of Convention
संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या विरोधात पत्रके वाटली

By

Published : Jan 10, 2020, 6:14 PM IST

Updated : Jan 10, 2020, 7:04 PM IST

उस्मानाबाद -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात संमेलन स्थळी पत्रके वाटण्यात आली आहेत. भारतीय विचार दर्शन या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ही पत्रके वाटली आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाटली पत्रके...

हेही वाचा... ...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री!

मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचे एक समिकरण तयार झालेले पहायला मिळत आहे. या वर्षी उस्मानाबाद येथे होत असेलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही वाद होताना पाहायला मिळत आहे. संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्ष पदी निवड झाली. त्यांच्या निवडीपासूनच त्यांना विरोध होत होता. हाच विरोध संमेलनाच्या दिवशी देखील पाहायला मिळाला.

हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटोंच्या विरोधात वाटली पत्रके

भारतीय विचार दर्शन या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात संमेलन स्थळी पत्रके वाटली आहेत. दिब्रिटो हे ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी वाटप केलेल्या पत्रकांत, 'खरेखुरे बंधमुक्त व्हा' हा उल्लेख आहे. यावेळी त्यांनी आनंद हर्डीकर यांच्या पुस्तिकेच्या प्रती देखील वाटल्या. पोलिसांनी तत्काळ ही पत्रके वाटणाऱ्यांना संमेलन स्थळावरून बाहेर काढले.

Last Updated : Jan 10, 2020, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details