महाराष्ट्र

maharashtra

नाशकात कोरोनामुळे 300 वर्षांची रहाड रंगपंचमी परंपरा होणार खंडीत

By

Published : Mar 29, 2021, 2:52 PM IST

नाशकात कोरोनामुळे 300 वर्षातची रहाड रंगपंचमी परंपरा खंडीत होणार आहे. जिल्ह्यातील रंगपंचमीवर यंदा कोरोनाचे सावट असून इतिहासात पहिल्यांदाच 300 वर्षाची रहाड परंपरा खंडित होणार आहे.

Rahad Rangpanchami
Rahad Rangpanchami

नाशिक -नाशकात कोरोनामुळे 300 वर्षांची रहाड रंगपंचमी परंपरा खंडीत होणार आहे. जिल्ह्यातील रंगपंचमीवर यंदा कोरोनाचे सावट असून इतिहासात पहिल्यांदाच 300 वर्षाची रहाड परंपरा खंडित होणार आहे. शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून गेल्या आठ दिवसापासून दिवसाला 2,500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच 2 एप्रिलपर्यंत परिस्थिती सुधारली नाही, तर लॉकडाऊन करण्याचा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 25 हजार रुग्ण उपचार घेत असून यात सर्वाधिक बाधित रुग्ण नाशिक शहरातील आहेत.

300 वर्षाची परंपरा खंडित -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आल्याने यंदा प्रशासनाने रंगपंचमीवर बंदी घातली असून या निर्णयामुळे नाशिक शहरातील 300 वर्षांची पेशवेकालीन रहाड परंपरा पहिल्यांदा खंडित होणार आहे. नाशिक शहराच्या जुने नाशिक भागातील शनी चौक, गाडगे महाराज चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा चौक या भागात पेशवेकालीन रहाडी असून या ठिकाणी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी होत असते. वर्षभर बंद असलेल्या रहाडी रंगपंचमीच्या आधी खुल्या करण्यात येतात. 10 बाय 10 व्यासाच्या आणि 6 फूट खोलीच्या या रहाडीत नैसर्गिक रंग टाकून नाशिककर मनमुराद रंगपंचमीचा आनंद घेत असतात. रंगपंचमीच्या दिवाशी प्रत्येक रहाडीवर हजारो रंगप्रेमींची गर्दी असते. यात लहानांपासून मोठ्यांचा सहभाग असतो.

शहरात 144 लागू कलम लागू -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने 10 मार्चपासून शहरात 144 कलम लागू केले असून पाच व्यक्ती पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पोलीस आता रस्त्यावर उतरले असून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाईसह दंड वसूल करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details