महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 7, 2020, 6:09 PM IST

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : 'निर्भया मॅरेथॉन'मधील दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग रद्द

निर्भया मॅरेथॉनमध्ये लहान मुले व वृद्ध व्यक्ती तसेच सर्दी ताप, खोकला अशा आजाराच्या रुग्णांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मॅरेथॉनमधील सहभागी सर्वजण एकाच वेळी, एकत्र येऊ नये, म्हणून मॅरेथॉनच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

Nashik
विश्वास नांगरे पाटील

नाशिक - शहर पोलीस दलातर्फे पोलीस व नागरिक यांच्यामधील संबंध सलोख्याचे राहावे, यासाठी दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदाही 8 मार्चला 'निर्भया मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे मॅरेथॉनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने मरेथॉनमधील विविध शाळांतील 1 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग रद्द करण्यात आला आहे. तसेच सामाजिक संस्थांची रॅली देखील रद्द करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.

विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त

हेही वाचा -'मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार'

निर्भया मॅरेथॉनमध्ये लहान मुले व वृद्ध व्यक्ती तसेच सर्दी, ताप, खोकला अशा आजाराच्या रुग्णांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मॅरेथॉनमधील सहभागी सर्वजण एकाच वेळी, एकत्र येऊ नये, म्हणून मॅरेथॉनच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. 5 किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी 7.45 ऐवजी सकाळी 6.30 वाजता, तर 3 किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी 8 ऐवजी 8.15 वाजता ठेवण्यात आली आहे. तसेच मॅरेथॉनदरम्यान आयोजीत सेलीब्रेटी टॉक शो हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

या मॅरेथॉनला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून यावर्षी 18 हजार 480 जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये महिलांची संख्या 5 हजार 720 एवढी आहे. मुख्य मैदानावर देखील सहभागी रनर्सला वेगवेगळे ठेवण्यासाठी सेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. तर मॅरेथॉन काळामध्ये 108 डॉक्टरांची टीम तैनात असणार आहे. मरेथॉन मार्गावर ठिक-ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा -कोरोनाची दहशत : नाशिकच्या बाजारपेठा रंगपंचमीसाठी सज्ज.. मात्र, विक्रीवर सावट

ABOUT THE AUTHOR

...view details