महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 3, 2019, 10:02 AM IST

Updated : Dec 3, 2019, 12:23 PM IST

ETV Bharat / state

एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू

एक वर्षाच्या बालकाचा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली. सोमवारी रात्री स्नानगृहातील टबमध्ये हा चिमुकला पडला होता. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

one year old child drown in water tub
आबीद शेख

नाशिक -एक वर्षाच्या बालकाचा पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उपनगर येथे घडली. सोमवारी रात्री स्नानगृहातील टबमध्ये हा चिमुकला पडला होता. नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू

हेही वाचा - फिरायला गेलेल्या २ आयटीआय विद्यार्थ्यांचा भातसा नदीत बुडून मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, आबीद हा घरात खेळत असताना रात्री नऊच्या सुमारास बाथरुममधील प्लास्टीकच्या टबात पडला. टबात भरपूर पाणी असल्याने तो बुडाला. ही घटना कुटुंबीयांना खूप उशिरा कळाली. त्यानंतर फुलमनी शेख या बालकाच्या आईने आपल्या चिमुकल्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उशीर झाल्याने आबीदला डॅाक्टरांनी मृत्य घोषित केले.

हेही वाचा - डहाणू तालुक्यात 18 गायींसह 2 बैलांचा संशयास्पद मृत्यू..

Last Updated : Dec 3, 2019, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details