महाराष्ट्र

maharashtra

कोरोना इफेक्ट : नाशिकमधील दिडशे वर्ष जुन्या मंदिरात नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

By

Published : Jul 25, 2020, 3:01 PM IST

शहरातील एकमेव 150 वर्षांपूर्वीचे जुने नागमंदिरही कोरोनामुळे बंद आहे. दरवर्षी नागपंचमीला या मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, नागपंचमीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

nagpanchami nashik
नागपंचमी नाशिक

नाशिक -राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागपंचमी उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा केला गेला.

कोरोना इफेक्ट : नाशिकमधील दिडशे वर्ष जुन्या मंदिरात नागपंचमी साध्या पद्धतीने साजरा

शहरातील एकमेव 150 वर्षांपूर्वीचे जुने नागमंदिरही कोरोनामुळे बंद आहे. नागपंचमीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. सकाळीच मंदिरात नागराजांची वैदिक पद्धतीने पूजा केली गेली. दरवर्षी नागपंचमीला या मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, कोरोनामुळे यावर्षी भाविक सकाळपासूनच मंदिराच्या बाहेरुन दर्शन घेत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपंचमी साध्या पद्धतीने साजरा केली गेली, असे या नागमंदिर समितीचे सदस्य बाळू लोखंडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details