ETV Bharat / state

कोपर्डे गावात दोन भावांचा शॉक लागून मृत्यू - Two brothers died of shock

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 10:13 PM IST

Two brothers died Koparde village : कोपर्डे येथील कडवी नदीजवळील शेतात रोपे लावून तण मारण्यासाठी गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय 36) तसंच स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) या दोन भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं संपूर्ण कोपर्डे गावात शोककळा पसरली आहे.

Two brothers died of shock in Koparde
सुहास, स्वप्नील यांचा विजेच्या धक्यानं मृत्यू (Etv Bharat Reporter)

कोल्हापूर Two brothers died Koparde village : जिल्ह्यातील कोपार्डे ता. शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ शेतात तणनाशक मारण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी अंत झाला. सुहास कृष्णा पाटील तसंच स्वप्नील कृष्णा पाटील अशी सख्या भावांची नाव आहेत.

दोघांचाही दुर्दैवी मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, सुहास तसंच स्वप्नील हे दोन भाऊ भाताची रोपे लावल्यानंतर शेतात मारण्यासाठी गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा धक्का लागून तो शेतात पडला, तर स्वप्नील त्याला काय झालं, असं म्हणत त्याच्या जवळ गेला असता त्यालाही विजेचा धक्का बसला. त्यावेली दोघे भाऊ शेतात पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही मुले घरी का आली नाहीत, याची माहिती घेण्यासाठी वडील कृष्णा पाटील तिथं गेले असता दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानं त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर गावातील लोकांनी धाव घेत त्यांना आधार दिला. दोन्ही काम करणारी मुलं काळानं हिरावून घेतल्यानं वडील हताश झाले.

पोलिसांकडून घटनेचा पंचनामा : घटनेचा पंचनामा केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. आपली दोन्ही मुलांची बातमी त्यांच्या आईला समजताच त्यांनी मोठ्यानं टोह फोडला. तसंच सुहासच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही मुलांच्या मृत्यूनं संपूर्ण पाटील कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. जिवंतपणी मुलांना अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली. दोघंही मितभाषी स्वभावाचे असल्यानं गावासह पंचक्रोशीत दोघा भावांचा मोठा मित्र परिवार आहे. सुहास आणि स्वप्नील यांच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला.

सर्व्हिसिंग सेंटर चालवून कुटुंबाला हातभार : सुहास आणि स्वप्निल पाटील यांचा गाडी सर्विसिंग सेंटरचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सांभाळत घरची शेतीची सांगड घालत दोघा भावांनी कुटुंबाला हातभार लावला होता. सुहासचं नुकतंच लग्न झालं होतं. तो भावाला शेती आणि व्यवसायात मदत करत होता. मात्र, दोघांच्या दुर्दैवी मृत्यूनं वडील कृष्णा पाटील यांच्यावर मुलांना अग्नी देण्याची वेळ आली. या दुर्दैवी घटनेनं शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलंत का :

'राहुल गांधींनी हिंदू समाजाचा अपमान केला, समाज योग्य वेळी बदला घेईल' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Eknath Shinde

चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana

मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.