महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराची नदीत उडी, प्रेयसीला नागरिकांनी रोखले

आदिनाथ उर्फ प्रेम शिंदे (रा.स्वामीनारायण नगर) या युवकाने कन्नमवार पुलाजवळील शाही मार्गाच्या कठड्यावरून गोदावरी नदी पत्रात उडी घेतली. त्या पाठोपाठ युवती देखील नदी पात्रात उडी घेण्याच्या तयारीत होती. मात्र, तेथून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने रिक्षा थांबवत युवतीला उडी मरण्या अगोदर रोखून नदी पात्रापासून दूर नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

By

Published : Jul 8, 2019, 2:56 AM IST

प्रियकराची नदीत उडी, प्रेयसीला नागरिकांनी रोखले

नाशिक - पंचवटी येथील कन्नमवार पुलाजवळ प्रेमीयुगलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने गोदावरी नदीत उडी घेतल्यानंतर, प्रेयसीला नागरिकांनी नदीत उडी मारण्या अगोदर रोखले.

आदिनाथ उर्फ प्रेम शिंदे (रा.स्वामीनारायण नगर) या युवकाने कन्नमवार पुलाजवळील शाही मार्गाच्या कठड्यावरून गोदावरी नदी पत्रात उडी घेतली. त्या पाठोपाठ युवती देखील नदी पात्रात उडी घेण्याच्या तयारीत होती. मात्र, तेथून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने रिक्षा थांबवत युवतीला उडी मरण्या अगोदर रोखून नदी पात्रापासून दूर नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.

या प्रकारनंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी नदी पात्रात दोन किलोमीटर याचा शोध घेतला. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने प्रेम शिंदे त्यांना सापडला नाही. यानंतर युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लग्नाला घरचे होकार देणार नाहीत म्हणून आत्महत्या करत असल्याची माहिती समोर येत आहे. पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details