महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 20, 2020, 6:34 PM IST

ETV Bharat / state

आनंददायक बातमी, रामकुंडजवळ बोअरला लागले १.५ इंच पाणी

कुंभमेळ्याच्या काळात याठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने असंख्य जिवंत पाण्याचे झरे बुजले गेले होते. मात्र, आता या ठिकाणी काँक्रीटीकरण काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर गोदामाई पुन्हा एकदा मोकळा श्वास घेणार असल्याने गोदाप्रेमींकडून याचे स्वागत करण्यात येत आहे.

नाशिक
नाशिक

नाशिक- गेल्या कुंभमेळ्यामध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने पंचवटीतील गोदापात्रात काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, यामुळे नदीपात्रामध्ये असलेले जिवंत पाण्याचे स्त्रोत बुजवले गेल्याचा आरोप करत नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्यात यावे, अशी मागणी गोदाप्रेमींकडून करण्यात आली होती.

नाशिक

गोदाप्रेमींचा अंदाज खरा ठरला

यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मनपा प्रशासन विरुद्ध गोदाप्रेमी असा संघर्ष देखील उभा राहिला होता. हे काँक्रीटीकरण काढण्यात यावे, यासाठी काही गोदाप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती. उच्च न्यायालयाने निकाल गोदाप्रेमींच्या बाजूने देत 'स्मार्ट सिटी' अंतर्गत याठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास रामकुंडात जवळच असलेल्या अहिल्यादेवी कुंडामध्ये जिवंत पाण्याचे स्त्रोत आहे की, नाही याचा शोध घेण्यासाठी बोर पद्धतीचा वापर करण्यात आला, यात आश्चर्याची बाब म्हणजे नदीपात्रात सुमारे दीड इंचावर पाणी लागल्याने गोदावरी पात्रामध्ये अनेक जिवंत जलस्रोत असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे गोदाप्रेमींनी केलेला दावा खरा ठरला आहे.

काँक्रीटीकरण काढण्यापूर्वी पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी बोरचा वापर

कुंभमेळ्याच्या काळात याठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने असंख्य जिवंत पाण्याचे झरे यात बुजले गेले होते. मात्र, आता या ठिकाणी काँक्रीटीकरण काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून यावर गोदामाई पुन्हा एकदा मोकळा श्वास घेणार असल्याने गोदाप्रेमींकडून याचे स्वागत करण्यात येत आहे. तर हे जिवंत झरे पुनरुज्जीत झाल्यास येत्या काळात गोदामाई बारमाही खळाळून वाहताना दिसेल, असा विश्वास गोदाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

१२ कुंडांचे सिमेंट-कॉक्रीट तत्काळ काढावे

नाशिक स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ट्रायल बोअर घेण्यात आला. ट्रायल बोअरलाच १.५ इंची पाणी लागले. सदर बाब श्री गोदावरी नदी पात्रात जिवंत जलस्रोत सुस्तिथीत आल्याच्या जिवंत पुरावा आहे. बैठीकत झालेल्या ठरावनुसार क्षणाचा विलंब न करता स्मार्ट सिटीने रामकुंडसह उर्वरित १२ कुंडांचे सिमेंट-कॉक्रीट तात्काळ काढावे असे याचिकेकर्ता देवांग जानी यानी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details