महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय महाविद्यालय जूनपासून कार्यान्वित होण्याची शक्यता, कामांना गती

पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाला वेग आला आहे. हे महाविद्यालय सुरू झाल्यास आदिवासी बांधवांसह रुग्णांना फायदा होणार आहे.

By

Published : Mar 2, 2020, 11:00 AM IST

medical college
वैद्यकीय महाविद्यालय जूनपासून कार्यान्वित होण्याची शक्यता, कामांना गती

नंदुरबार - गेल्या दहा वर्षापूर्वी नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही घोषणा कागदावरच राहिली. अनेक अडचणी येत असल्याने हे महाविद्यालय कार्यान्वित होऊ शकले नव्हते. मात्र, यावर्षी प्रशासनाच्यावतीने या कामाला आता गती देण्यात येत असून जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालय जूनपासून कार्यान्वित होण्याची शक्यता, कामांना गती

हेही वाचा -पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा हवेत गोळीबार.. तरुणीला धमकावण्याचा प्रयत्न

दरम्यान, या महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटीदेखील दूर करण्यात आल्या आहेत. यावर्षी जूनपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये निधीची तरतूद केल्याने इमारतीच्या बांधकामाला वेग आला आहे. हे महाविद्यालय सुरू झाल्यास आदिवासी बांधवांसह रुग्णाना त्याचा फायदा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details