महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 26, 2022, 4:40 PM IST

ETV Bharat / state

Fair Price For Cotton : कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रस्ता रोको

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने ( Farmer agitation due to lack of price for cotton ) नंदुरबारमध्ये शेकऱ्यांनी रास्ता रोको ( Farmers protest in Nandurbar ) केला आहे. यावेळी शेवाळी महामार्गावर ( Nandurbar on Shewali Highway ) सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Farmers protest in Nandurbar
Farmers protest in Nandurbar

कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रस्ता रोको

नंदुरबार - नंदुरबार येथील राजीव गांधी कार्यालय खरेदी केंद्रांतर्गत सीसीआयने कापूस खरेदी केली जाते. मात्र, कापसाला योग्य तो भाव मिळत ( Farmer agitation due to lack of price for cotton ) नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नियंत्रण शेवाळी महामार्गावर ( Nandurbar on Shewali Highway ) रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको -सीसीआयने कापसाचे खरेदी दर कमी केल्याने नंदुरबार येथील केंद्रावर कापसाची खरेदी बंद पाडत संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. नंदुरबार तालुक्यातील पळाशी कापुस खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांचा रस्ता रोको करण्यात आला आहे. शुक्रवारी सीसीआयची कापुस खेरदी बंद झाल्यानंतर आज सोमवारी खरेदी सुरु झाल्यानंतर तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी कापसाचा भाव पडला. त्यामुळेच शेतकऱी चांगलेच संतप्त झाले. तासभरापासुन शेतकरी शेवाळी नेंत्रग महामार्गावर ठाण मांडुन आहेत. यामुळे महामार्गावर दोन किलोमीटरच्या अंतरावर रांगा लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details