महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 29, 2020, 9:29 PM IST

ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने विकावे लागले- अशोक चव्हाण

गेल्या तीन वर्षांपासून साखरेचा भाव निश्चित करण्यासाठी पाठपुरावा केल्याने साखरेचा भाव निश्चित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने विकावे लागले आहेत. अशी परिस्थिती गेल्या चोवीस वर्षात कधीच आली नव्हती, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने विकावे लागले- ना.अशोक चव्हाण
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखाने विकावे लागले- ना.अशोक चव्हाण

नांदेड - केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी संस्था, साखर कारखाने अर्थिक अडचणीत आले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून साखरेचा भाव निश्चित करण्यासाठी पाठपुरावा केल्याने साखरेचा भाव निश्चित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने विकावे लागले आहेत. कारखाना कठीण परिस्थितीमध्ये असतानाही भाऊरावने शेतकरी व कामगारांचे देणे चुकते केले आहे, अशी परिस्थिती गेल्या चोवीस वर्षात कधीच आली नव्हती, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी भाऊराव रौप्य महोत्सवी गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

परतीच्या पावसामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य शासानाने दहा हजार कोटीचे पॅकेज घोषित केले असून त्यापैकी आडीच हजार कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार आहेत. यात मराठवाड्याला साडे-पाचशे कोटी मिळणार आहेत. या निधीतून तुटलेले रस्ते, पुल तयार करण्यात येणार आहेत. केळीच्या पिकविम्याचा चौकशी अहवाल मंत्रालयात पाठविण्यात आला असून याकडे लक्ष देण्यत यावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली. अर्धापूरच्या वळण रस्त्याप्रमाणे रेल्वेच्या भूसंपादनासाठी चौपट मावेजा मिळण्यासाठी केंद्राला पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.


केंद्र सरकार साखर कारखानदारी मोडीत काढत आहे- विश्वजित कदम यांची टीका

शंकरराव चव्हाण यांच्या विकास कामांचा वारसा अशोक चव्हाण यांनी पुढे नेत आहेत. मराठवाड्यात साखर कारखाना यशस्वी चालून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर आघात झाले, पण त्यातुन ते बाहेर पडले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून खूप आधार दिला आहे. तसेच परतीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्यात येईल. तसेच केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी मोडीत काढण्याचे काम करत आहे, अशी टिका विश्वजित कदम केली.

ABOUT THE AUTHOR

...view details