महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प! आमदारांच्या मध्यस्थीने मार्ग मोकळा...

२ ऑगस्ट पासून संततधार पाऊस झाल्याने किनवट हिमायतनगर महामार्गावरील पूल खचल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. यातच ३ ऑगस्ट रोजी एक युवक येथील पाण्यामध्ये बेपत्ता झाला. त्याचा अद्याप शोध लागला नसल्याने गावकऱ्यांनी जोपर्यंत तरुणाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली.

By

Published : Aug 5, 2019, 1:20 PM IST

महामार्ग

नांदेड - जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर राज्य महामार्गावरील पुल संततधार पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपने ठप्प झाली आहे. तर या पुलावरुन एक युवक पाण्यात बेपत्ता झाल्याने जोपर्यंत त्या युवकाचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. सदर प्रकरणी आमदार प्रदीप नाईक यांच्यी मध्यस्थीनंतर गावकऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केले.

किनवट हिमायतनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प


दोन ऑगस्ट पासून संततधार पाऊस झाल्याने किनवट हिमायतनगर महामार्गावरील पूल खचल्याने वाहतूक बंद असून राज्य महामार्ग पूर्णतः बंद झालेला आहे. दरम्यान ३ ऑगस्ट रोजी पुलावरून दुसरीकडे जाणारा एक युवक पाण्यामध्ये बेपत्ता झाला होता. त्याचा अद्याप शोध लागला नसल्याने गावकऱ्यांनी जोपर्यंत तरुणाचा मृतदेह सापडत नाही तोपर्यंत राज्य महामार्ग चालू करू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तसेच खराब कामामुळे हा रस्ता खचला असून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही समस्त गावकऱ्यांनी केली होती.


सदर परिस्थीती बघता किनवट माहूर मतदारसंघाचे आमदार प्रदीप नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तहसीलदार व पोलीस प्रशासन यांना पाचारण करून राज्य महामार्गावरील पूल तयार करून वाहतुकीस मोकळा करावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आमदार नाईक यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे गावकऱ्यांनी नंतर आंदोलन मागे घेत महामार्ग सुरळीत करण्यास मदतही केली.

ABOUT THE AUTHOR

...view details