महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 20, 2023, 10:42 PM IST

ETV Bharat / state

Nanded Crime : हैद्राबादला राहण्याच्या वादातून चिमुकल्यांना फेकले विहिरीत; आईच ठरली कर्दनकाळ

खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या पतीसोबत हैदराबाद येथे राहण्याच्या हट्टातून पत्नी आणि पतीत झालेला वाद दोन चिमुकल्यांच्या जिवावर बेतला. खुद्द जन्मदात्रीनेच आपल्या तीन वर्षांच्या मुलासह चार महिन्यांच्या चिमुकलीलाही विहिरीत फेकून दिले. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी घटना देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथे घडली.

Children Thrown Into Well Due to Dispute Over Stay in Hyderabad; Birth Mother Became a Lifesaver For Little Ones
हैद्राबादला राहण्याच्या वादातून चिमुकल्यांना फेकले विहिरीत; जन्मदात्रीच ठरली कर्दनकाळ

नांदेड/हानेगाव : देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथील संतोष आडे हा हैदराबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तर त्याची पत्नी पूजा ही गुत्ती तांडा येथेच मुलगा सिद्धार्थ (वय ३ वर्षे) व मुलगी फुंदी (वय ४ महिने) या दोन मुलांना घेऊन राहत होती. तिच्यासोबत सासू व सासरेही राहत होते. आपणही पतीसोबत हैदराबाद येथेच राहावे, असे पूजा हिला नेहमी वाटत असे. त्यातूनच तिने मागील काही दिवसांपासून हैदराबाद येथे येण्याचा पतीकडे हट्ट धरला होता. यातूनच अनेक वेळा पती- पत्नीमध्ये वादही झाला आहे.

पत्नी पूजा हिची पतीकडे हैद्राबादला नेण्याचा आग्रह :संतोष आडे हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला असता पत्नी पूजा हिने आपल्याला हैदराबादला नेण्याचा आग्रह पतीकडे धरला. मात्र, संतोषने आपण तेथे अद्याप स्थिरस्थावर झालेलो नाही. तसेच, मुलगी फुंदी ही केवळ चार महिन्यांची आहे. ती थोडी मोठी झाल्यानंतर तुला घेऊन जाईन, अशी पूजाची समजूत काढण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र, यातूनच दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

पत्नीचा संताप अनावर :पती पोलिसांत गेला आहे, हे समजताच पूजाचा संताप अधिकच वाढला. या संतापात पूजाने दोन्ही अपत्यांना विहिरीत फेकून दिल्याची माहिती पती संतोष आडे यांनी दिली.

सासू-सासऱ्यांनाही केली होती मारहाण :१८ जानेवारी रोजी पूजा हिने तिच्या आई-वडिलांना आपला पती संतोष हा हैदराबाद येथे आपल्याला नेत नाही, असे सांगितले होते. त्यातून पूजाच्या आई-वडिलांनी संतोष याच्या आई- वडिलांना मारहाण केली होती. त्यानंतर संतोष आडे यांनी दोघांनाही नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, गुरुवारी संतोष व त्याचे आई-वडील यांच्या तक्रारीवरून पूजाच्या वडिलांवर मरखेल पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पूजाने टोकाचे पाऊल उचलले.

क्रूर मातेवर खुनाचा गुन्हा : गुरुवारी रात्री उशिरा मरखेल पोलीस ठाण्यात क्रूर माता पूजा आडे विरुद्ध ३०२ व ३०९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वतःच्या मुलांना क्रूरपणे मृत्यूच्या दारात फेकणाऱ्या या आरोपी मातेला अटक झाली आहे.

सासर अन् माहेरही गावातच : या घटनेतील चिमुकल्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र हाणेगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उशिरापर्यंत यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. संतोष यांची पत्नी पूजा हिचे माहेर आणि सासर गुत्ती तांडा येथेच आहे. त्यामुळे सर्व जण एकाच गावात वात्सव्यला होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details