महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 10, 2020, 2:22 AM IST

ETV Bharat / state

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण..

संबंधित डॉक्टर हे शहरातील शाहूनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचे स्व‌ॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापूर्वी विवेक नगर, देगलूर नाका आणि मुखेड येथील डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. यानंतर आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांची संख्या ४ झाली आहे.

Doctor working in Nanded Govt hospital found COVID-19 positive
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरलाच कोरोनाची लागण..

नांदेड : श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना कोरोना कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यानंतर आता जिल्ह्यात कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या ४ वर पोहचली आहे.

श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी सीटी स्कॅन बसविण्यासाठी औरंगाबाद येथुन टेक्निशिअन आला होता. मशीन बसविल्यानंतर तो परत गेला. मात्र, त्यानंतर त्यास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याचा स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविला असता, तो कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर, या टेक्निशिअनच्या संपर्कात आलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.

संबंधित डॉक्टर हे शहरातील शाहूनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील ४ जणांचे स्व‌ॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापूर्वी विवेक नगर, देगलूर नाका आणि मुखेड येथील डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. यानंतर आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरांची संख्या ४ झाली आहे.

मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १९३ वर पोहचली असून, त्यांपैकी १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५३ जणांवर जिल्ह्यातील कोरोना कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. यासोबतच, आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरणाला मिळाले जीवदान, नांदेड सिटी परिसरातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details