महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 23, 2020, 10:52 AM IST

ETV Bharat / state

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरू; मराठवाड्याला फायदा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रांमध्ये स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) या प्रयोगशाळेला मान्यता प्राप्त झाली आहे.

nanded corona news
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रांमध्ये स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रांमध्ये स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) या प्रयोगशाळेला मान्यता प्राप्त झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रांमध्ये स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे चाचण्या करणारे किट्स आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. कमी वेळात जास्तीत जास्त संशयितांच्या टेस्ट करण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. लवकरात लवकर आजाराचे नमुने तपासण्यात आल्यास तत्परतेने इलाज करता येतो. याच अनुषंगाने ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्ह्यातील स्वॅबचे नमुने औरंगाबाद आणि पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. मात्र, आता जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याने वेळ व संसाधने वाचणार आहेत. संबंधित प्रयोगशाळेत प्रतिदिन पाचशे नमुन्याच्या तपासण्या करण्याची क्षमता आहे. जनुकीय मटेरियलद्वारे विषाणुचे निदान होणार आहे.

विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच 'रुसा'कडून पाच कोटींचा निधी मिळाला होता. याचा वापर आधुनिक यंत्रसामग्रीसाठी करण्यात आला आहे. तसेच प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली उपकरणे व सुविधा तयार करण्यासाठी राज्य शासनाने ५२ लाख मंजूर केले आहेत. याव्यतिरिक्त अत्याधुनिक उपकरण रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा १०० मी अंतरापर्यंत कोणीही येणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आलीय. या ठिकाणी फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आता या प्रयोगशाळेमुळे मराठवाड्यातील तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांना फायदा होणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.जी.बी.झोरे, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांच्यासह त्यांची सर्व टीम कार्यरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details