महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, नागपुरातील घटना

पूजा ओमप्रकाश तिवारी ही तरुणी तिच्या अॅक्टिव्हा गाडीने नागपूर शहराकडे जात असताना एका ट्रकने तिला धडक दिली.

By

Published : Apr 24, 2019, 8:46 AM IST

मृत पूजा तिवारी

नागपूर - भरधाव ट्रकच्या धडकेत एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर - अमरावती मार्गावर घडली. पूजा तिवारी असे मृत तरुणीचे नाव आहे.

पूजा ओमप्रकाश तिवारी ही तरुणी तिच्या अॅक्टिव्हा गाडीने नागपूर शहराकडे जात असताना एका ट्रकने तिला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालक शिवलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details