महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 8, 2021, 7:27 PM IST

Updated : Mar 8, 2021, 7:40 PM IST

ETV Bharat / state

शंख नाद करत दिल्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

शहरातील अंबाझरी तलाव परिसरात सकाळच्या वेळी त्यांनी शंखनाद करत दिवसाची सुरुवात केली आहे. या उपक्रमातून सकारात्मक उर्जेसह आरोग्याच्या संदेश देण्याचे काम केले आहे.

woman's day celebrate in Nagpur
संपादित छायाचित्र

नागपूर - नागपुरात आज महिला दिनाची सुरुवात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्याचा संकल्प महिला समुहाने घेतला होता. यात शहरातील अंबाझरी तलाव परिसरात सकाळच्या वेळी त्यांनी शंखनाद करत दिवसाची सुरुवात केली आहे. या उपक्रमातून सकारात्मक उर्जेसह आरोग्याच्या संदेश देण्याचे काम केले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

नागपुरातील प्रतिष्ठित सामाजिक महिला कार्यकर्ता हंसाबेन पाघडाल यांनी महिलांना एकत्र करत शंखनाद करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. वेगळ्या पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात करण्याचे ठरवले असल्याने आरोग्यदायी संदेश या उपक्रमातून दिला. हंसाबेन पाघडाल स्वत: शंख वादक आहे. त्यातून एक प्रकारे गळ्याच्या व्यायामही होतो. यामुळे आवाजात सुधारणा होऊन कोरोनाच्या काळात घरात बसून राहताना अशा पद्धतीने वेळेचा सदउपयोग त्यांनी केला आहे.

टाळेबंदीत दिले मोफत प्रशिक्षण

यासह महिलांनीही शंख वादन केले पाहिजे यासाठी मागील 6 महिन्यांपासून त्यांनी काही महिलांनासोबत घेऊन रोज शंखनाद करत आहे. आता सुमारे 15 महिलांचा चमू शंख वादनात तयार झाले आहे. नागपुरातील इच्छुक महिलांनाही शंख वादनाची कला आत्मसात करता यावी, यासाठी पाघडाल यांनी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हा कार्यशाळा केवळ महिलांसाठी असेल व यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार, असेही त्या म्हणाल्या आहे.

हेही वाचा -२०२१-२२चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी समाधानकारक; कृषी तज्ज्ञ शरद निंबाळकरांचे मत

पुराणात, शास्त्रात शंखाचा उल्लेख

शंख हा समुद्रमंथनातून निघालेला असून देवी देवतांच्या हातात असल्याच्या उलल्लेख शास्त्रामध्ये पाहायाला मिळतो. यातून निघणाऱ्या ध्वनीने सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते, असे हंसाबेन यांनी सांगितले.

हेही वाचा -नागपूर : बालविवाह रोखण्यात यश; मुलीची बालगृहात राहण्याची व्यवस्था

हेही वाचा -नागपूर: बाजारपेठ बंद तरीही रस्त्यांवर गर्दी

Last Updated : Mar 8, 2021, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details