महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेची रणधुमाळी : वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर विदर्भ महामंच लढवणार 40 जागा

येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील 62 पैकी 40 जागा लढवण्याचा निर्णय विदर्भ निर्माण महामंचने घेतला आहे.

विदर्भ महामंच लढवणार 40 जागा

By

Published : Aug 21, 2019, 9:33 AM IST

नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भवाद्यांनी देखील कंबर कसली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील 62 पैकी 40 जागा लढवण्याचा निर्णय विदर्भ निर्माण महामंचने घेतला आहे.

विदर्भ महामंच लढवणार 40 जागा

गेल्या लोकसभा निवडणूकीत सर्व विदर्भवादी संघटना एकत्र येऊन लढल्या होत्या. विदर्भ निर्माण महामंचमध्ये माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची (विदर्भ राज्य आघाडी) विरा. राजेश काकडे यांचा जनसुराज्य पक्ष, विदर्भ जनआंदोलन समिती, आप, अशा विविध पक्षांचा समावेश आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत विदर्भ निर्माण महामंचाला फारसे यश आले नाही. तरीही वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन विधानसभा निवडणूक लढविली जाईल, अशी माहिती विदर्भवाद्यांनी दिली आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यात विदर्भ निर्माण महामंच निवडणूक लढवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details