महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घराबाहेरचा गेट कोसळून १८ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत

नागपुरात अंगावर गेट पडून एका चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना हुडकेश्वर परिसतरा घडली.

By

Published : May 18, 2019, 4:41 PM IST

घराबाहेरचा गेट कोसळून १८ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत


नागपूर - घरासमोर लावलेला स्लायडिंगचा लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना नागपुरातील हुडकेश्वर परिसरात घडली. १८ महिन्यांच्या निहारिका माहुले या चिमुरडीला दुर्घटनेत प्राण गमवावे लागले.

घराबाहेरचा गेट कोसळून १८ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत

रवी व निकिता माहुले या दाम्पत्याची निहारिका ही एकुलती एक मुलगी होती. हुडकेश्वर परिसरातील चक्रपाणीनगरमध्ये हेडाऊ यांच्या घरी भाड्याने राहतात. निहारिकाचा काका पंकज रात्री घरी पोहचला. तो गेटमधून बाईक घरात घेत होता. तितक्यात निहारिकाने काकाला भेटण्यासाठी धाव घेतली. पंकज स्लायडिंग गेट बंद करत असताना ते निहारिकाच्या अंगावर पडले. पंकजने आरडाओरड करुन सर्वांना बोलावलं. सर्वांनी निहारिकाच्या अंगावर पडलेला गेट हटवला. मात्र, या दुर्घटनेत निहारिका गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा गुरुवारी मृत्यू झाला. लाडक्या निहारिकाच्या मृत्यूने माहुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details