महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 3, 2020, 7:49 PM IST

ETV Bharat / state

स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळले बेवारस, सावनेर तालुक्यातील घटना

ज्या ठिकाणी या अर्भकाला टाकून देण्यात आले होते, तो वर्दळीचा मार्ग असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या निदर्शनात ते आले. बाळ रडत असल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सावनेर
सावनेर

नागपूर- सावनेर तालुक्यात एक नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. ज्या ठिकाणी या अर्भकाला टाकून देण्यात आले होते, तो वर्दळीचा मार्ग असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या निदर्शनात ते आले. बाळ रडत असल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

अनैतिक संबंधातून किंवा मुलगी झाली असल्याने निर्दयी मातेने ते बाळ रस्त्यावर फेकले असावे, अशी चर्चा परिसरात आहे. पोलिसांनी अर्भक शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा -नागपुरात आयुष मंत्रालयाकडून कोरोना रक्षक किटचे वितरण सुरू

स्त्री जातीचे हे अर्भक असून काही तासांपूर्वीच जन्मले असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. रस्त्याच्या बाजूला अर्भक पडून असल्याची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन या बाळाला ताब्यात घेतले. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा किंवा ती मुलगी आहे म्हणून कुटुंबीयांनी हे कृत्य केले असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा -'सुशांतची हत्या की, आत्महत्या; आमच्याकडे अद्याप अधिकृत माहिती नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details