महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2021, 7:28 AM IST

Updated : Aug 8, 2021, 9:57 AM IST

ETV Bharat / state

त्या दिवशी महेश राऊत दारू पिऊन होता; पालकमंत्री नितीन राऊत यांची माहिती

घटनेच्या दिवशी महेश राऊत यांनी शेजारच्या व्यक्तीची तक्रार केली ही पहिली घटना नसून यापूर्वीही त्याने मनपा आणि पोलिसांना फोन केले होते. यामुळे वारंवार एखादा व्यक्ती कोणाची तक्रारी करत असेल तर त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे.

nitin raut
नितीन राऊत

नागपूर - नागपुरात पोलिसांच्या मारहाणीनंतर महेश राऊत नामक व्यक्तीने अपमानित झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे एकीकडे पोलीस प्रशासनाच्या वागणुकीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असतांना दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी घटनेच्या वेळी महेश राऊत हे दारू पिऊन होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. ते शनिवारी पोलीस जिमखामा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमारही उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री नितीन राऊत

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी मृत महेश राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यात चित्रा वाघ यांनी पोलिसांवर सडकून टीका केली. उपराजधानी नागपुरात मागील काही दिवसांपूर्वी दिव्यांग मुलीवर एकाच रात्री दोन वेळा बलात्काराची घटना असो की पोलिसांच्या मारहाणीत अपमानित झालेल्या महेश राऊत याची आत्महत्या दोन्ही प्रकरणांत पोलिसांची चूक नाही, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

यात घटनेच्या दिवशी महेश राऊत यांनी शेजारच्या व्यक्तीची तक्रार केली ही पहिली घटना नसून यापूर्वीही त्याने मनपा आणि पोलिसांना फोन केले होते. यामुळे वारंवार एखादा व्यक्ती कोणाची तक्रारी करत असेल तर त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे. पोलिसांना आधी फोन करून नंतर फोन बंद करुन ठेवला. जेव्हा पोलीस विचारपूस करण्यासाठी पोहोचले त्यावेळी महेश राऊत हा दारू पिऊन होता. तो नेहमी दारू प्यायचा का, यामुळे त्याच्या मानसिकतेवर काही परिणाम तर झाला नव्हता ना? याचा तपास पोलीस करत आहे, अशी माहितीही पालकमंत्री राऊत यांनी दिली. दरम्यान, या घटनेला पाच दिवस झाल्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
तर मृत्यूच्या शेवटच्या क्षणी काय ते काय बोलले? हेसुद्धा रेकोर्डवर घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ती घटना दुर्दैवी -

गतिमंद मुलीवर एकाच रात्री बलात्कार झालेली घटना नक्कीच दुर्दैवी आहे. मात्र, यात मुलगी गतिमंद व्यक्तींसोबत असे असताना त्यांना जाणीव होत नाही. यापूर्वीही ती मुलगी घरातून निघून गेली होती. 2019 ते 2021 या कालावधीत ती बालसुधार गृहात होती. दिव्यांगांची मानसिक अवस्था ही फार वेगळ्या पद्धतीची असते. याबाबत तपासणी करायला सांगतले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तर गुन्हे प्रकटीकरणात मागील वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्याने वाढ झाली आहे. 65 वरून ते प्रमाण 70 टक्के झाले आहे. पोलीस प्रशासन चांगले काम करत आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्यात यश आले, असेही पालकमंत्र्यांनी नितीन राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात शुक्रवारी ६ हजार ६१ नवे रुग्ण, तर १२८ रुग्णांचा मृत्यू

Last Updated : Aug 8, 2021, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details