महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झूंज अद्याप सुरूच

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. पीडितेच्या प्रकृतीबाबतची माहिती शनिवारी रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेवून दिली. पीडितेची प्रकृती अद्याप नाजूक आहे. पीडिता ही व्हेंटिलेटर असल्यामुळे तिच्यावर आज होणारे ड्रेसिंग आणि इतर उपचार हे उद्या होणार आहेत.

By

Published : Feb 8, 2020, 1:26 PM IST

nagpur
हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची प्रकृती खालावली

नागपूर - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची प्रकृती अजुनही गंभीरच आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. शनिवारी पीडित तरुणीच्या प्रकृतीसंदर्भातील मेडीकल बुलेटीन रुग्णालयाने प्रसिद्ध केले आहे.

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची प्रकृती खालावली

हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड; पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न, प्रकृती धोक्याबाहेर नाही

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची पाच दिवस उलटून गेल्यानंतरही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. पीडितेच्या प्रकृतीबाबतची माहिती शनिवारी रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेवून दिली. पीडितेची प्रकृती अद्याप नाजूक आहे. पीडिता ही व्हेंटिलेटर असल्यामुळे तिच्यावर आज होणारे ड्रेसिंग आणि इतर उपचार हे उद्या होणार आहेत. पीडितेची चेहऱ्यावरची सूज कमी होत आहे. तिला दृष्टी असून ती इशाऱ्यांनी संवादाला प्रतिसाद देत असल्याचे डॉ. दर्शन रेवनार यांनी सांगितले.

हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड : 'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण

दरम्यान, शुक्रवारपेक्षा पीडितेची तब्येत अजुनच खालावली असून ती रात्री पासून व्हेंटिलेटरवर आहे. पीडितेला जखमांमुळे झालेला जंतू संसर्ग नियंत्रणात आला असून तीचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून देण्यात येणाऱ्या अन्नाला देखील ती प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉ. राजेश अटल यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details