महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर महामेट्रोचे ट्रॅव्हल कार्ड लॉन्च

महाकार्डच्या माध्यमातून प्रवासी मेट्रो ट्रेनचे तिकीट खरेदी करू शकणार आहेत. या शिवाय हे कार्ड एखाद्या डेबिट कार्डसारखे  असल्याने प्रवासी या कार्डच्या मदतीने अनेक आर्थिक व्यवहारदेखील करू शकतील.

By

Published : Mar 1, 2019, 12:13 PM IST

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर महामेट्रोचे ट्रॅव्हल कार्ड लॉन्च

नागपूर - माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या दिशेने महामेट्रोने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी महामेट्रोने महाकार्ड तयार केले आहे. नागपूर शहराच्या महापौर आणि प्रथम नागरिक असणाऱ्या नंदा जिचकार यांना पाहिले कार्ड देण्यात आले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थीत होते.

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर महामेट्रोचे ट्रॅव्हल कार्ड लॉन्च

माझी मेट्रोच्या रिच-१मधील काम आता जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. आरडीएसो म्हणजेच रिचर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनकडून चाचणी पूर्ण झाल्यानंतर अलिव्हटेड ट्रॅकवर मेट्रो सुरू करण्यासंदर्भात परवानगीचे प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर आज महामेट्रोने प्रवाशांच्या सुविधेकरिता महाकार्ड उपलब्ध केले आहे. या महाकार्डच्या माध्यमातून प्रवासी मेट्रो ट्रेनचे तिकीट खरेदी करू शकणार आहेत. या शिवाय हे कार्ड एखाद्या डेबिट कार्डसारखे असल्याने प्रवासी या कार्डच्या मदतीने अनेक आर्थिक व्यवहारदेखील करू शकतील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. आज प्रवाश्यांसाठी महाकार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पाहिले महाकार्ड नागपूर शहराच्या महापौर नंदा जिचकार यांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details