महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2023, 10:52 PM IST

ETV Bharat / state

Ashish Deshmukh On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचासुद्धा २०२४ मध्ये कसबा होणार- आशिष देशमुख

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. पुण्यातील कसब्यामधून कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघ दक्षिण-पश्चिमचेसुध्दा कसबा होईल असे ते म्हणाले आहेत.

Ashish Deshmukh On Devendra Fadnavis
आशिष देशमुख

नागपूर: गेली अनेक वर्षे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम मतदारसंघातुन निवडणूक येत आहेत. २०१९मध्ये कॉंग्रेसचे आशिष देशमुख यांनी याच मतदार संघातून त्यांना लढत दिली होती. आशिष देशमुख म्हणाले की, कसबा आणि नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम मतदारसंघांमध्ये परिस्थिती जवळपास सारखीच आहे. कसबा निवडणुकीचा आधार घेत डॉ. देशमुख यांनी त्याच मतदारसंघाचा निकष येथे लावला आहे आणि दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा दावा त्यांनी केला आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून देवेंद्र फडणवीस आमदार आहेत. अटीतटीच्या लढतीत ही जागा भाजपच्या खात्यात गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत येथे कॉंग्रेस विजयी होणार आहे.


दक्षिण-पश्चिमचा कसबा करून दाखवतो: २०१९च्या निवडणुकीत मी फडणवीसांच्या विरोधात लढलो. त्यावेळला देवेंद्र फडणवीस हे १ लाखांच्या वर मतांनी निवडून येतील, असे दावे केले जात होते. मात्र ते केवळ ३५ हजारांनीच निवडून आले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसच्या प्रयत्नांमुळए त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. तेव्हा मला (आशिष देशमुख यांना) दक्षिण-पश्चिममध्ये काम करायला केवळ ११ दिवस मिळाले होते. २०२४ आपल्याला कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाल्यास विजयी नक्की होणार आहे. परिणणी पुढच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघाचा कसबा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्हा परिषद,नागपूर पदवीधर किंवा नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पाहिली तर मागील काही काळापासून नागपूर कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहात आहे. कॉंग्रेसची पाळेमुळे येथे भक्कम आहेत. ज्या पद्धतीने अत्यंत सुरक्षित मतदार संघ कसबा भाजपच्या हातून गेला, अगदी त्याच पद्धतीने दक्षिण- पश्चिम नागपूर हासुद्धा मतदारसंघ जाणार आहे.


साम,दाम,दंड वापरूनही विजय मिळाला नाही: कसबासुद्धा भाजपचा बालेकिल्ला होता. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जवळपास सर्व मंत्री तळ ठोकून होते. तरीही तेथे त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. सर्व प्रयत्न करूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. यामुळे जनता काँग्रेसकडे वळत आहे: महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे भाजपला यापुढील प्रत्येक निवडणुकीत भोवणार आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यातुलनेत भाजप लागोपाठ चुका करत आहे. त्यामुळे जनता पुन्हा कॉंग्रेसकडे वळणार, यात तीळमात्र शंका नाही.


सामाजिक समीकरणे कॉंग्रेससोबत: मी असेल किंवा अजून कुणी असेल कॉंग्रेसच्या उमेदवारांना आम्ही सर्व मिळून निवडून आणू. येत्या विधानसभा निवडणुकीत जनता दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजपला नाकारेल. फडणवीस मुख्यमंत्री असतांना मी त्यांच्या विरोधात लढलो. दक्षिण-पश्चिम नागपूर हा भाजपचा गढ मानला जातो. दोन्ही मतदार संघात ब्राम्हण समाजाची सुमारे ३० ते ३५ टक्के मतदार आहेत. ते देखील भाजपवर नाराज आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघामध्ये आतून खूप खदखद आहे. सामाजिक समीकरणे कॉंग्रेससोबत आहेत. कॉंग्रेस पक्षाने संधी दिली आणि वेळीच सिग्नल दिला तर कामाला लागून चित्र पालटवून दाखवू असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:Satyajeet Tambe on Adani Ambani : आर्थिक परिषदेत अदानी आणि अंबानी हवेत कशाला? सत्यजित तांबे यांचा राज्य सरकारला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details