महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चालकाचे प्रसंगावधान ; ब्रेक फेल झाल्याने झाडाला धडकवली ट्रॅव्हल्स, ५ जण किरकोळ जखमी

नागपूरमध्ये चालकाने ट्रॅव्हल्सचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रॅव्हल्स झाडाला धडकवली. चालकाच्या या प्रसंगावधनामुळे मोठा अपघात टळला आहे.

By

Published : Feb 21, 2019, 1:28 PM IST

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स

नागपूर- वर्ध्यावरुन नागपूरला येत असताना नरेंद्र नगर भागात सदानंद ट्रॅव्हल्सचे ब्रेक फेल झाले. यामुळेचालकाने ही ट्रॅव्हल येथील उड्डाण पूलाजवळच झाडाला धडकवली. बस चालकाच्या या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. ही ट्रॅव्हल वारजेवरुन नागपूरच्या दिशेने येत होती.

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स

या अपघात ५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसानी दिली. जखमींना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने ट्रॅव्हलमध्ये जास्त प्रवासी नसल्याने मोठी जीवीतहानी टळली.

झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स
ट्रॅव्हल्स चालवत असताना चालकाला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने वाहतूक आणि रहदारी नसलेली जागा बघत ट्रॅव्हल्स एका झाडाला धडकवली. ड्रायव्हरच्या या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला, अशी माहिती सोनेगाव पोलिसांनी दिली.
झाडाला धडकलेली ट्रॅव्हल्स

ABOUT THE AUTHOR

...view details